दिल्लीत अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला भीषण आग; 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

दिल्लीत अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला भीषण आग; 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील विवेक विहारमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका बाल संगोपण केंद्राला (बेबी केअर सेंटर) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून 12 जणांना वाचवण्यात यश आले आहेत. यापैकी 5 बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त दिले आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी विवेक विहारमधील बाल संगोपण केंद्राला (बेबी केअर सेंटर) आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत बाल संगोपण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 12 नवजात बालकांना सुखरूप बाहेर काढले. मात्र 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;