दखल – स्वप्रेरणेचे व्यवस्थापन

दखल – स्वप्रेरणेचे व्यवस्थापन

सतत धावपळ… 24 तास काम केलं तरी काही ना काही तरी राहूनच जातं. घर अस्ताव्यस्त म्हणून जास्त चिडचिड, नोकरी करताना कार्यालयात पोहोचण्यास उशीर म्हणून होणारी मनासिक घुसमट, असं सगळ्यांची मर्जी सांभाळत आयुष्य जगताना स्वत:ला वेळ देणं जमलंच नाही कधी ही हुरहूर मनाला लागून राहते. आयुष्याची समीकरणं कितीही बदलत असली तरी आपली पाठराखण करणारी आणि प्रत्येक वेळी नव्याने कळत जाणारी असतात. आपण इतरांना बदलू शकत नाही, मात्र स्वत:ला बदलणं आपल्याच हातात असतं. मग आपणच आपल्या दैनंदिन जीवनाचं आणि आपल्या कामाचं व्यवस्थापन करून आपला विकास घडवून आणावा. त्यासाठी आवश्यक आहे वेळेचे नियोजन. प्रस्तुत पुस्तक केवळ टाइम मॅनेजमेंट शिकवत नाही, तर एकूणच आयुष्याचं व्यवस्थापन शिकवते. वेळ आणि आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी घडय़ाळाचे कुसंस्कार कसे पुसावेत? स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय? वेळेचे गणित सोडवण्याची तंत्र आणि मंत्र कोणती? स्त्राr व पुरुषाचे व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल. एकदा नियम आणि पद्धत समजली की काय करू? कसं करू? हे द्वंद संपतं. लहान लहान यशाने स्वत:च स्वत:ला प्रेरित करण्याची कला शिकून घेतली की ती आयुष्यभर उपयोगी पडते. संदर्भ बदलले तरी सूत्रं तीच राहतात आणि त्यासाठी अनुभवसिद्ध सुप्रसिद्ध प्रशिक्षक कांचन दीक्षित यांचे संदर्भग्रंथ वाचकांना सर्वतोपरी मदत करेल.

टाइम अॅण्ड सेल्फ मॅनेजमेंट
लेखिका : कांचन दीक्षित
पृष्ठ संख्या : 266
किंमत : 350/-
प्रकाशक : साकेत प्रकाशन

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;