हृतिक रोशनने घटस्फोटानंतर सुजैन खानला पोटगी म्हणून दिले होते इतके कोटी

हृतिक रोशनने घटस्फोटानंतर सुजैन खानला पोटगी म्हणून दिले होते इतके कोटी

बॉलिवूडचा हँडसम बॉय अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा विवाह २० डिसेंबर २००० रोजी झाला होता. हृतिक रोशनच्या विवाहानंतर अनेक तरुणींचा हिरमोड झाला होता. कारण हृतिक रोशनबाबत क्रश असलेल्या अनेक तरुणी आजही आहेत. हृतिक रोशन आणि सुझैन यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या 6 वर्षांनंतर 2006 मध्ये ह्रिहान आणि 2008 मध्ये हृदानचा जन्म झाला. पण नंतर हळूहळू त्यांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला. 31 ऑक्टोबर 2014 रोजी या जोडप्याचा घटस्फोट झाला.

घटस्फोट झाल्यानंतर भरपाई म्हणून हृतिकने सुझैनला अंदाजे 380 कोटी रुपये द्यावे लागले होते. भारतातील सर्वात महागड्या घटस्फोटांच्या यादीत हृतिकचा घटस्फोट पहिल्या क्रमांकावर आहे.

घटस्फोट का झाला?

घटस्फोटाच्या जवळपास दोन वर्षानंतर, 2016 मध्ये एका मुलाखतीत सुझैन खानने हिने तिच्या घटस्फोटावर मौन सोडले होते. तिने म्हटले होते की, “आम्ही आमच्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मी ठरवले की आम्ही एकत्र नसलेले चांगले आहे. खोट्या नातेसंबंधात न राहणे आणि जागरूक राहणे महत्वाचे आहे. आम्ही जवळचे (मित्र) आहोत.” सुजैनने सांगितले की, आम्ही मुलांसाठी मित्र राहणे निवडले आहे.

‘ऋतिक-कंगना यांच्यात वाद झाला तेव्हा सुझैनने हृतिकला पाठिंबा दिला होता. तिने ट्विट केले की क्वीन अभिनेत्रीने लीक केलेले सर्व फोटो मॉर्फ केलेले आहेत.

हृतिक आणि सुजैन वेगळे झाले असले तरी ते त्यांच्या मुलांसाठी अनेकदा एकत्र येतात. ते विविध सुट्ट्यांमध्ये आणि कौटुंबिक डिनरमध्ये देखील एकत्र दिसतात. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी ते सर्व करत आहेत.

दोघेही पुन्हा रिलेशनशिपमध्ये

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा मुलगा रिहानच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त पार्टीत हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादही हजर होती. सुझैन आणि सबा यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर समोर आले होते. सुझैन देखील तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी याच्यासोबत मुलगा हृधनसोबत आनंदाने पोज देताना दिसली होती.

सुझैन अर्सलान गोनीला डेट करत आहे तर हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;