लग्नानंतर विसाव्या दिवशीच काळाचा घाला, हृदयविकाराच्या झटक्याने नगरमधील तरुणाचं निधन

लग्नानंतर विसाव्या दिवशीच काळाचा घाला, हृदयविकाराच्या झटक्याने नगरमधील तरुणाचं निधन

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील साकत (हनुमान वस्ती) येथील सूरज महादेव मिसाळ (वय 22) याचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. या घटनेने मिसाळ कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मिसाळ कुटुंबीय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल चालवत होता. काल मेडिकलमधून घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खासगी दवाखान्यात नेले. दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुरजचे बावीस दिवसांपूर्वी 2 मे रोजी लग्न झाले होते. सुरजला बरे वाटत नाही म्हणून बीड येथील दवाखान्यात काही दिवस त्याने उपचार घेतले होते. बीडवरून आल्यावर बरे वाटल्याने काल तो मेडिकलमध्ये गेला होता. सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने जामखेड येथील एका खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. आज सकाळी सात वाजता हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सुरजच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;