हार्दिक – नताशा यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर? ‘या’ कारणांमुळे होतेय घटस्फोटाची चर्चा

हार्दिक – नताशा यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर? ‘या’ कारणांमुळे होतेय घटस्फोटाची चर्चा

भारतीय क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप टीमचा उप-कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आणि पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हार्दिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हार्दिक – नताशा यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

सांगायचं झालं तर, रडिट युजरने दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा देखील केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक – नताशा एकत्र राहात नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय नताशा हिने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी गेल्या आहेत ज्यामुळे घटस्फोटाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हार्दिक याची पत्नी आणि नाताशा स्टेनकोविक हिने सोशल मीडियावरून ‘पांड्या’ नाव काढलं आहे. त्यामुळे हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. एवंढच नाहीतर, नताशा हिने हार्दिक याच्यासोबत असलेले सर्व फोटो देखील डिलिट केले आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट केलेले नाहीत.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 4 मार्च रोजी नताशा हिचा वाढदिवस होता. पण हार्दिक याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. नाहीतर, हार्दिक कायम नताशा हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायचा.

सामन्यांदरम्यान कायम पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर असणारी नताशा यंदा दिसली नाही. त्यामुळे देखील घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. चाहत्यांमध्ये देखील हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलं नाही.

हार्दिक – नताशा यांचं लग्न

हार्दिक – नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. नताशा – हार्दिक यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;