Pune Car Crash : मुलगा, बाप गजाआड होताच आजोबालाही अटक, ड्रायव्हरला डांबल्याचा आरोप

Pune Car Crash : मुलगा, बाप गजाआड होताच आजोबालाही अटक, ड्रायव्हरला डांबल्याचा आरोप

पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातप्रकरणी बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा आरोपी वेदांत अग्रवाल याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यालाही अटक झाली आहे. आता पोलिसांनी कारवाई करत आरोपी वेंदात अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्र कुमार यालाही अटक केली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या सध्या पोलिसांच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

जनतेच्या रेटय़ामुळे ‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी अखेर कारवाई, पुण्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित

आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे. नातवाच्या कारनाम्यानंतर आता आजोबा कारनामा समोर आला आहे. बिल्डर मुलगा विशाल अग्रवाल याला पळून जाण्यात मदत केल्याचा आणि नातवाने केलेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणल्याचा आरोप आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्यावर करण्यात आला आहे. नातवाला बाजूला करून ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल याने दोन दिवस डांबल्याचा आरोप आहे. नातू अडचणीत येऊ नये यासाठी अपघातानंतर लगेचच ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Pune Porsche accident – बिल्डरने गाडीचा चालक बदलण्याचा केला प्रयत्न, कठोर कारवाई होणार

आपण कार चालवत असल्याचं ड्रायव्हरने सुरुवातीला सांगितलं, हे खरं आहे. पण ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केलं? याचाही आम्ही तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते. यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत सुरेंद्र अग्रवाल याला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;