Lok Sabha Election 2024 : तळीरामांना खूशखबर; मुंबईचा निकाल जाहीर होईपर्यंत ड्राय डे, हायकोर्टाचे आदेश
मुंबईतील लोकसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर होईपर्यंत ड्राय डे असेल, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. उपनगरातही निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच दारुबंदी असेल, असे सुधारित पत्रक जारी करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवस ड्राय डे असेल असा फतवा मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी यांनी काढला. याविरोधात मेसर्स इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड. वीणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्यामार्फत दोन स्वतंत्र याचिका केल्या होत्या.
न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. यातील एक याचिका मुंबईतील दारुबंदीविरोधात होती तर दुसरी याचिका उपनगर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या ड्राय डेला आव्हान देणारी होती.
उपनगरातील जिल्हाधिकारी यांनी ड्राय डेच्या आदेशात बदल केला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंतच दारुबंदी असेल, असे सुधारित पत्रक उपनगर जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे, अशी माहिती सरकारी वकील प्राची ताटके यांनी खंडपीठाला दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने एक याचिका तत्काळ फेटाळून लावली. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हाधिकारी यांनी दारूबंदीचे पत्रक जारी केले आहे. यामध्ये बदल करता येणार नाही, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयात स्पष्ट केले. उपनगर जिल्हाधिकारी यांनी आदेशात बदल केले. मुंबई जिल्हाधिकारी बदल का करत नाहीत, असा सवाल न्यायालयाने केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List