विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान; शिवसेनेकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान; शिवसेनेकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.

विलास पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे विधान परिषद सदस्य येत्या 7 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या चार जागांवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

31 मे रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली जाईल. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. 10 जूनला त्या अर्जांची छाननी करण्यात येईल तर 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 1 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

शिवसेनेकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

विधान परिषदेसाठी शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;