वेंगुर्ले बंदरात बोट बुडाली; चार बेपत्ता, एकाचा मृत्यू

वेंगुर्ले बंदरात बोट बुडाली; चार बेपत्ता, एकाचा मृत्यू

वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात आढळली. ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान, बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर(66)  यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेश येथील चार खलाशांपैकी तीन खलाशी अद्याप बेपत्ता त्यात आझान मुनीलाला कोल वयः 16, चांद गुलाम महम्म्द, व शिवराम कोल यांचा समावेश आहे. तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः 66  यांचा मृतदेह मोचेमाड येथे सापडला आहे.

कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर बोटीद्वारे शोध कार्य सुरू 

वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोधकार्य सुरू आहे. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसेच तहसीलदार ओंकार ओतारी, फिशीरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.

तीन खलाशी पोहून आल्याने बचावले 

समुद्रकिनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता(49),  राजा कोल(29) व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत. ते किनाऱयावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;