जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

एप्रिलमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री अॅण्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक झाली असून त्यांना 29 मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

विजयकुमार देवेंद्र याचा गेल्या महिन्यात मुरगन देवेंद्र याच्याशी वाद झाला होता. तो राग डोक्यात ठेवून गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास मुरगन आणि वेलू देवेंद्र यांनी मक्कावाडी जंक्शन येथे दुचाकीवरून आलेल्या विजयला अडवले. मग सोबत आणलेल्या चापूने विजयच्या पोटावर वार केले. दरम्यान हा प्रकार कळताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजयला तत्काळ शीव इस्पितळात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून मुरगन आणि वेलू या दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;