मलायका अरोराची सवत भडकली, शूरा खान थेट म्हणाली, माझ्या आणि अरबाज खानच्या..

मलायका अरोराची सवत भडकली, शूरा खान थेट म्हणाली, माझ्या आणि अरबाज खानच्या..

2017 मध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान याचे नाव अनेक मुली आणि अभिनेत्रींसोबत जोडले गेले. विदेशी अभिनेत्रींना डेट करताना देखील अरबाज खान हा दिसला. मागच्या वर्षी 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित राहिले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. विशेष म्हणजे अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नात अरहान खान हा देखील धमाल करताना दिसला.

अरबाज खान हा नेहमीच पत्नी शूरा खान हिच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. हेच नाही तर हे दोघे कायमच एकसोबत स्पाॅट होताना देखील दिसतात. अरबाज खान आणि शूरा खान यांना लग्नानंतर सतत ट्रोल केले जाते. अरबाज आणि शूरा यांच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे, यावरूनही अनेकदा बोलले जाते.

नुकताच शूरा खान हिचे एक सेक्शन सोशल मीडियावर झाले. यावेळी एका व्यक्तीने तिच्यामध्ये आणि अरबाज खानमध्ये असलेल्या वयाबद्दल आणि उंचीच्या फरकावर प्रश्न विचारला. यावर सडेतोड उत्तर देताना शूरा खान ही दिसलीये. आता शूरा खान हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच यावर बोलताना देखील शूरा दिसलीये.

शूरा म्हणाली की, अरबाजची उंची 5.10 फूट आहे आणि माझी उंची 5.1 आहे. हेच नाही तर पुढे शूरा म्हणाली, वय फक्त आकडा आहे. पहिल्यांदाच वयाच्या आणि उंचीच्या होणाऱ्या टिकेवर बोलताना शूरा खान ही दिसली. अरबाज खान याचे वय 56 आहे तर शुरा खान हिचे वय 35 आहे. यामुळे या दोघांवर कायमच टीका ही केली जाते.

शूरा खान आणि अरबाज खान यांच्या वयामध्ये तब्बल 21 वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. अरबाज खान हा सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याच्या घरी जाताना मलायका अरोरा दिसली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;