गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या प्रकल्पावरून वडेट्टीवार यांनी सरकारला धरले धारेवर
50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात गेला आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल करत धारेवर धरले आहे.
वडेट्टीवार आपल्या ट्वीट संदेशात म्हणतात की, आधी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले, आता मध्य प्रदेशमध्ये प्रकल्प पळवण्यात आला आहे. महाराष्ट्रावर भाजपाची आगपाखड का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List