एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकांना अटक
डोंबिवली येथील एमआयडीसी स्फोट प्रकरणी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या डोंबिवली एमआयडीसीमधल्या अमुदान कंपनीच्या मालक आहेत. नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मालती आणि मलय मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी अनुदान या कंपनीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला. या कंपनीची मालकी मालती मेहता यांच्याकडे आहे. स्फोटानंतर मालती आणि मलय फरार झाले होते. हे दोघंही नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून नाशिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List