राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमधून राज्य सरकारवर केला आहे.

शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे राज्यामध्ये एकूण 19 जिल्हे त्यातले 40 तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सोळा तालुक्यात आहे एकंदरीत विचार केला तर 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता असल्याचे माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, तसेच राज्यात भीषण दुष्काळ आहे त्या ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने लोकांची वणवण होत आहे. महाराष्ट्रात एकंदर 2 हजार 92 मंडळ आहेत यातले पंधराशे मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेष विचार केला तर मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत परंतु यातला साठ्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यात 40 महत्वाची धरणे आहे परंतु या विभागात फक्त 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे छत्रपती संभाजी नगरला 81 लघु प्रकल्प आहेत इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत या भागात फक्त 24 टक्के पाणी शिल्लक असल्याचे पवार म्हणाले. यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये 5.50 इतकाच जलसाठा शिल्लक आहे तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात हीच परिस्थिती जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होण्याची शक्यता आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्याकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारला आम्ही माध्यमांच्या मार्फत जागे करण्याचे आवाहन करत आहे हे करूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला इतर पर्याय आहेत असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहेत. मोठी धरणांमध्ये संभाजीनगरमधील धरणांमध्ये 10 टक्के पाणी आहे. तर, पुणे विभागातील धरणांमध्ये 35 टक्के,नाशिकमधील धरणांमध्ये टक्के 22 पाणी आहे.’, असे सांगत या विभागात किती टँकर सुरू आहेत? याची आकेडवारीच शरद पवार यांनी सांगितली. शरद पवार म्हणाले की, मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जुलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणं भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये 1867 टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये 632 गाव आणि वाड्यामध्ये 755 टँकर सध्या लागत आहेत, असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, राज्यात यंदा 10, 572 टँकर लागत आहेत, मागील वर्षी 1,108 टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी सुचवलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;