‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी समंथा नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची निवड

‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी समंथा नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची निवड

‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाची प्रतीक्षा असंख्य प्रेक्षकांना आहे. ‘पुष्पा: द राइज’ या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फाजिल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा आयटम साँग होता. ‘ऊ अंटावा’ हे तिचं गाणं तुफान गाजलं होतं. आजही पार्ट्यांमध्ये हे गाणं वाजवलं जातं. विशेष म्हणजे समंथाच्या करिअरमधील हा पहिलावहिला आयटम साँग होता. त्यानंतर आता ‘पुष्पा 2’मध्ये कोणत्या अभिनेत्रीचा आयटम साँग असेल, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. या दुसऱ्या भागात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयटम साँग करणार असल्याचं कळतंय.

पुष्पा 2′ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडीच महिना शिल्लक असताना त्यात एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. ‘पुष्पा: द रुल’मध्येही धमाकेदार आयटम साँग असणार आहे. मात्र त्यात समंथा नाही तर दुसरी अभिनेत्री झळकणार आहे. सुरुवातीला अभिनेत्री दिशा पटानीच्या नावाची चर्चा होती. मात्र दिशा नव्हे तर ‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरी यामध्ये आयटम साँग करणार असल्याचं कळतंय. येत्या जून महिन्यात या गाण्यासाठी शूटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल सेटसुद्धा तयार केला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर तृप्तीला रातोरात लोकप्रियता मिळाली. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी खूपच खास ठरला होता. सध्या ती कार्तिक आर्यनसोबत ‘भुलभलैय्या 3’ या चित्रपटासाठी शूटिंग करतेय. याशिवाय ती एका रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृप्तीच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट लागला असून त्यात ती राजकुमार राव आणि विकी कौशलसोबत काम करणार आहे.

‘पुष्पा: द राईज’ या पहिल्या भागाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आती सीक्वेलसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे तिप्पट रकमेची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक सुकुमार यांना ओटीटीच्या या करारातून काही भाग मिळणार आहे. ‘पुष्पा 2’चे डिजिटल हक्क हे तब्बल 100 कोटींना विकले गेल्याचं कळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;