Pune Porsche Accident : ‘तो पोर्शे विकत घेऊ शकतो, तर मग…’, मुनव्वरचा वेदांतवर निशाणा

Pune Porsche Accident : ‘तो पोर्शे विकत घेऊ शकतो, तर मग…’, मुनव्वरचा वेदांतवर निशाणा

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मुनव्वर त्याने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मुनव्वरने पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन वेदांतवर निशाणा साधत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की , 17 वर्षीय वेदांतने त्याच्या पोर्श कारने अपघात केला असून, अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अशात 15 तासांत वेदांतला जामिन मंजूर झाल्यानंतर खळबळ माजली होती. आता वेदांतला बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात झालेल्या अपघाताचा सर्वच स्तरातून विरोध होत असताना मुनव्वरने देखील संताप व्यक्त केला आहे. एक्सवर मुनव्वरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मुनव्वर म्हणाला, ‘तो पोर्श खरेदी करू शकतो तर, बाकी गोष्टी देखील विकत घेऊ शकतो…’ एवढंच नाहीतर, आणखी एक एक्स करत मुनव्वर म्हणाला, ‘मी 17 वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे फक्त नोकिया 1100 फोन होता. ज्याला 2 रबर लावलेले होते…’ सध्या मुनव्वरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

 

मुनव्वरच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येक जण मुनव्वरच्या बाजूने कमेंट करत बिल्डर बाप-लेकाचा विरोध करत आहेत. आरोपींवर योग्य कारवाई झाली पाहिजे, त्यांनी शिक्षा झालीच पाहिजे… पैसा असल्यामुळे दोन जणांचा जीव घेतला आहे.

अन्य एका नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘त्या कुटुंबियांना विचारा ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं आहे. त्यांचं दुःख पैशांनी खरेदी करता येणार नाही.’ मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी वेदांतच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. वेदांतच्या आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता याप्रकरणी काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुनव्वर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ जिंकल्यानंतर मुनव्वर फार व्यस्त झाला आहे. अनेक शो करताना देखील मुनव्वर दिसत आहे. अभिनय विश्वात देखील मुनव्वर पदार्पण करणार आहे. ‘फस्ट कॉपी’ या वेब सीरिजमध्ये मुनव्वर भूमिका साकारताना दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;