गृहमंत्री फडणवीस आता तरी जागे व्हा; इंदापूरच्या तहसीलदारांवरील भ्याड हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

गृहमंत्री फडणवीस आता तरी जागे व्हा; इंदापूरच्या तहसीलदारांवरील भ्याड हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. हल्लेखोरांनी डोळ्यात चटणीची पूड टाकून लोखंडी रॉडने हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून पाटील आणि त्यांच्या वाहनाचा चालक बचावला आहे. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे, असे त्या म्हणाल्या.

गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध, असेही सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले.

नक्की काय घडलं?

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून सकाळी 11 च्या सुमारास शासकीय वाहनातून (क्र. एमएच 42 एएक्स 1661) कार्यालयाकडे निघाले होते. याचवेळी संविधान चौकात विना नंबर असलेल्या चारचाकीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक मल्हारी मखरे यांच्या अंगावर चटणीची पूड टाकून लोखंडी रॉडने हल्ला चढवला. सुदैवाने चालक आणि तहसीलदार श्रीकांत पाटील या हल्ल्यातून बचावले. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;