सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाचा फोन तपासण्याविषयी जान्हवी कपूरची कबुली; म्हणाली..

सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाचा फोन तपासण्याविषयी जान्हवी कपूरची कबुली; म्हणाली..

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये तिने बॉयफ्रेंड शिखर पहाडियाविषयी मोकळेपणे उल्लेख केला आहे. याआधी ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही तिने शिखरविषयीच्या भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रमोशनदरम्यान जान्हवीच्या गळ्यात ‘शिखू’ या नावाचं लॉकेटसुद्धा पहायला मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिच्या बॉयफ्रेंडविषयी एक खुलासा केला आहे. या मुलाखतीत जान्हवीने थेट सांगितलं की ती तिच्या बॉयफ्रेंडचा फोन तपासते.

‘झी’ला दिलेल्या या मुलाखतीत जान्हवीने याची कबुली दिली की ती तिच्या बॉयफ्रेंडचा फोन चेक करते. या सवयीला तिने ‘रेड फ्लॅग’ (चुकीचं) असंही म्हटलंय. “मला माहितीये की हे रेड फ्लॅग आहे, तरीसुद्धा मी माझ्या पार्टनरचा फोन चेक करते”, असं जान्हवी म्हणाली. या मुलाखतीला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने विचारलं होतं की बॉयफ्रेंड्सना त्यांच्या गर्लफ्रेंडचा फोन तपासण्याची परवानगी असायला हवी का? त्यावर जान्हवी म्हणाली “नाही, तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का?” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

याआधीच्या एका मुलाखतीत जान्हवीला तिचा ‘सपोर्ट सिस्टिम’ कोण आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने शिखरचं नाव घेतलं होतं. “मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं ती म्हणाली होती.

शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा जान्हवीने सारा अली खानसोबत हजेरी लावली, तेव्हा तिने पहिल्यांदा शिखरसोबतच्या नात्याविषयी हिंट दिली होती. करणच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने शिखरचं नाव घेतलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;