माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत केलं लग्न, आज 2 नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे अभिनेता

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत केलं लग्न, आज 2 नामवंत  रेस्टॉरंटचा मालक आहे अभिनेता

भारतीय सिनेविश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना काम तर मिळालं पण प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. सेलिब्रिटी फक्त एका हीटच्या प्रतीक्षेत राहिले. पण यशाच्या शिखरावर पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण होतं. एवढंच नाहीतर, सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्यानंतर काही सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळाली नाही. सध्या आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ज्याने 50 सिनेमांमध्ये काम केलं पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. रुपेरी पडद्यावर सर्व प्रयत्न करुन देखील अभिनेता यशाच्या शिखरावर पोहोचला नाही. अशात अभिनेत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत लग्न केलं आणि आज अभिनेता 2 नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे.

1996 मध्ये दिग्दर्शक महेश भट्ट दिग्दर्शित ‘दस्तक’ या सिनेमातून दोन कलाकारांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात अभिनेत्री सुष्मिता सेनने मुख्य भूमिका साकारली होती, तर अभिनेता शरद कपूरने खलनायकाची भूमिका केली होती. सुष्मिता आणि शरद या दोघांसाठी हा पहिलाच सिनेमा होता. ‘दस्तक’ सिनेमानंतर सुष्मिता यशाच्या शिखरावर पोहोचली. शरदच्या वाट्याला मात्र अपयश आलं.

शरदबद्दल सांगायचं झालंतर, झगमगत्या विश्वात त्याचा कोणी गॉडफादर नव्हता. अशात अभिनेता स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईत आला. मुंबईत येण्यासाठी अभिनेत्या कुटुंबियांना देखील अनेकदा समजावलं. 1993 मध्ये अभिनेता मुंबईत आला आणि त्याचा संघर्ष सुरु झालाय जवळपास 6 महिने अभिनेता मुंबईच्या रस्त्यांवर झोपला होता.

अनेक निराशेनंतर अखेर शरद कपूरला ‘स्वाभिमान’ या मालिकेत छोट्या भूमिकेची ऑफर आली. त्यानंतर महेश भट्ट यांनी त्याची दखल घेतली आणि शरद कपूरला ‘दस्तक’मध्ये सुष्मिता सेनसोबत मुख्य भूमिकेची ऑफर दिली. त्यानंतर शरदने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्याने सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं.

अनेक सिनेमांमध्ये काम करून देखील अभिनेत्याला यश मिळालं नाही. शरद कपूरने अनेक फ्लॉप सिनेमे दिले असले तरी, अभिनेता ‘जय हो’ ‘तमन्ना’, ‘लक्ष्य’ आणि ‘जोश’ यांसारख्या सिनेमामुळे चर्चेत आहे. शिवाय हटके आणि डॅशिंग बॉडीमुळे देखील अभिनेता चर्चेत राहिला.

शरद कपूर त्याच्या पर्सनल आयुष्यापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. जेव्हा अभिनेत्याच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा चाहते देखील थक्क झाले. शरदने माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसू हिच्यासोबत लग्न केलं. 2008 मध्ये शरद आणि कोयल यांचं लग्न झाले. आता अभिनेता खासगी आयुष्यात आनंदी आहे.

शरद फक्त अभिनेता नाहीतर, उद्योजक देखील आहे. शेखर कपूर दोन नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे मुंबई आणि बंगलोर याठिकाणी अभिनेत्याचे रेस्टॉरंट आहे. अभिनेता आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;