प्लास्टिक सर्जरीनंतर इतका बदलला अदिती राव हैदरीचा लूक; तुम्हीही व्हाल थक्क!
अभिनेत्री अदिती राव हैदरीला बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानल जातं. राजघराण्यातून आलेल्या अदितीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे अदिती सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी या वेब सीरिजमध्ये आदितीने बिब्बोजानची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अदिती या सीरिजमधील तिच्या लूकमुळेही चर्चेत आली आहे. मात्र आता दिसणारी अदिती आणि आधीची अदिती यांमध्ये भरपूर फरक असल्याचं लक्षात आलंय.
सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये अदितीचा चेहरा पूर्ण वेगळा दिसायचा आणि आता ती पूर्ण वेगळी दिसते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या फोटोंवरून ही गोष्ट सहज लक्षात येते. अदितीने प्लास्टिक सर्जरी करून तिचे आयब्रो आणि नाक यांचा आकार बदलल्याचं दिसून येतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List