आर्थिक परिस्थिती हालाखीची, पैसे मागत काढले दिवस, आज ‘हा’ अभिनेता आहे 347 कोटींचा मालक

आर्थिक परिस्थिती हालाखीची, पैसे मागत काढले दिवस, आज ‘हा’ अभिनेता आहे 347 कोटींचा मालक

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या बालपणी घरची परिस्थीती हालाखीची हती. फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाने देखील अनेक वाईट दिवस काढले. अनेक रात्र तर अभिनेता उपाशी पोटी झोपला. पण अभिनेत्याने कधी धैर्य सोडलं नाही. अभिनेता स्वतःची मेहनत आणि कष्टाच्या जोरावर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. फोटोत दिसणारा मुलगा आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. भारतात अनेक ठिकाणी अभिनेत्याची संपत्ती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, फोटोत दिसणारा अभिनेता आहे तरी कोण? फोटोत दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेते मिथुन चक्रवर्ती आहे. मिथुन दा यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. पण एक काळ असा होता जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. एका शोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः त्यांच्या वाईट काळाबद्दल सांगितलं.

सा रे गा मा पा लिटिल चँप्सच्या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते, ‘मी असे दिवस देखील पाहिले आहेत, जेव्हा मला उपाशी पोटी झोपावं लागलं आहे. एक दिवस असा अला जेव्हा मला विचार करावा लागायचा मला उद्या खायला कुठे मिळेल आणि मी कुठे झोपेल. मी कितीतरी दिवस फुटपाथवर झोपलो आहे…’

पुढे मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘मी जे दिवस भोगले आहे, ते कोणी दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष असतो. पण माझ्या चेहऱ्याच्या रंगावरुन देखील माझी टीका करण्यात आली. माझ्या चेहऱ्याच्या रंगामुळे अनेकदा माझा अपमान झाला आहे…’ असं देखील मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते.

मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक अडचणींचा सामना केला. पण दिवस सारखे नसतात… असंच काही मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत देखील झालं. आज मिथुन चक्रवर्ती आलिशान आयुष्य जगतात. आज त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे अनेक घरं आणि महागाड्या कारचं कलेक्शन आहे. मुंबई, ऊटी, कोलकाता याठिकाणी त्यांची संपत्ती आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचे मुंबईत दोन बंगले आहेत. त्यांच्या फार्महाऊसची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. अभिनेते मसिनागुडीमध्ये 16 कॉटेज आणि म्हैसूरमध्ये 18 कॉटेजसह अनेक रेस्टॉरंटचे मालक आहेत. मिथुन चक्रवर्ती फक्त सिनेमेच नाहीतर, व्यवसायातून देखील कोट्यवधींची माया कमावतात.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्ती यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची नेटवर्थ 347 कोटी आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत 350 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 1989 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांचे 17 सिनेमे प्रदर्शित झाले होते. आता देखील मिथुन चक्रवर्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;