माझे पेशन्स पाहू नको, हिंदुस्थानात परत ये! देवेगौडा यांचा जर्मनीत पळून गेलेल्या नातवाला इशारा

माझे पेशन्स पाहू नको, हिंदुस्थानात परत ये! देवेगौडा यांचा जर्मनीत पळून गेलेल्या नातवाला इशारा

माझे पेशन्स पाहू नको, हिंदुस्थानात परत ये आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून कायदेशीर कारवाईला सामोरा जा… अशा शब्दांत देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे सुप्रीमो तसेच  एच.डी. देवेगौडा यांनी एक्सवरून नातू प्रज्वलला बजावले आहे. सेक्स स्पँडलच्या आरोपानंतर प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेल्यामुळे एच.डी. देवेगौडा प्रचंड संतापल्याचे समोर आले आहे.

एच.डी. देवेगौडा यांनी पक्षाच्या लेटरहेडवर पत्र लिहिले असून मी जे काही बोलतोय ते आवाहन नाही तर इशारा आहे. जर प्रज्वलने या इशाऱयाकडे दुर्लक्ष केले तर त्यांना माझ्या आणि कुटुंबीयांच्या सर्व सदस्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल. जर माझ्याबद्दल तुझ्या मनात जराही आदर असेल तर तत्काळ हिंदुस्थानात परत ये असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्वल रेवण्णाला माझा इशारा या मथळय़ाखाली देवेगौडा यांनी दोनपानी पत्र लिहिले आहे. 18 मे रोजी देवेगौडा यांनी 18 मे रोजी प्रज्वलबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. जेडीएसचे कार्यकर्ते, देवेगौडा यांचे संपूर्ण कुटुंब आणि मित्रांना प्रज्वलवरील आरोपांमुळे प्रचंड धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी वेळ लागला, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रज्वलने जे केले ते माहीत नव्हते

 मी लोकांना विश्वासाने सांगू इच्छितो की, प्रज्वल जे काही करत होता ते आम्हाला कुणालाच माहीत नव्हते. तसेच माझ्याकडे हे सर्व समजण्याची क्षमताही नाही. वाईट हेतूने विविध राजकीय षड्यंत्रे रचली गेली. त्याबद्दल मला कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नाही किंवा बचावही करायचा नाही, असेही देवेगौडा यांनी पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;