नगर शहरातील 83 होर्डिंग्ज अनधिकृत, महापालिकेच्या सर्वेक्षणात उघड; सोमवारपासून कारवाई

नगर शहरातील 83 होर्डिंग्ज अनधिकृत, महापालिकेच्या सर्वेक्षणात उघड; सोमवारपासून कारवाई

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहर व उपनगर परिसरात 384 परवानाधारक हार्ंडग्जसह तब्बल 83 अनधिकृत हार्ंडग्ज आढळून आली आहेत. तसेच, 44 हार्ंडग्जचा परवाना संपुष्टात आलेला आहे. या सर्व हार्ंडग्ज मालकांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. येत्या सोमवारपासून अनधिकृत हार्ंडग्ज उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी शहरातील अनधिकृत हार्ंडग्जचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्यावर ही जबाबदारी सोपवून सर्वेक्षणासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने बुधवारी अहवाल सादर केल्यावर अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी आढावा घेतला.

सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, माळीवाडा (शहर) कार्यालयाच्या हद्दीत 15, झेंडीगेट 21 व बुरुडगाव कार्यालयाच्या हद्दीत 9 अशी 83 अनधिकृत हार्ंडग्ज आढळून आली. तसेच, परवाना संपुष्टात आलेली 44 हार्ंडग्ज असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या सर्वांना तत्काळ हार्ंडग्ज काढून घेण्याच्या नोटिसा बजवाव्यात, तर सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिले आहेत. दरम्यान, शहरात परवाने देण्यात आलेल्या 384 हार्ंडग्जचीही तपासणी केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;