20 हजार इस्टेट एजंटस्ची नोंदणी स्थगित
वारंवार संधी देऊनही एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱया राज्यभरातील तब्बल 20 हजार एजंटना महारेराने दणका दिला आहे. या एजंटची नोंदणी स्थगित केली असून व्यवसाय करण्यावरही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील एजंट हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. बहुतेक वेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपका&त येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळते. या माहितीच्या आधारे ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतात. म्हणून महारेराने एजंटना प्रशिक्षण घेऊन, परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे. 10 जानेवारी 2023 ला घेतलेल्या या निर्णयाला अनेकदा मुदतवाढ देऊन अखेर 1 जानेवारी 2024 नंतर तो सर्व एजंटसाठी बंधनकारक करण्यात आला. तरीही पात्रता नसलेले 20 हजारांच्या वर एजंट या क्षेत्रात कार्यरत असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्यात आले.
…तर विकासकांची महारेरा नोंदणी होणार रद्द
पात्रता नसलेले 20 हजार एजंट या क्षेत्रात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. गरज पडल्यास अपात्र एजंटची सेवा घेणाऱया विकासकांची महारेरा नोंदणी रद्द करायला महारेरा कचरणार नाही. तशी वेळ विकासकांनी महारेरावर आणू नये, असा इशारा महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी दिला.
– अनेक एजंटसनी त्यांची एजंट म्हणून नोंदणी रद्द करण्याची विनंती महारेराकडे केलेली आहे. ही नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराने कार्यपद्धती जाहीर केली आहे .
– महारेरा स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे 47 हजार एजंट्सनी महारेराकडे नोंदणी केली आहे. यापैकी 13785 एजंट्सनी परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे त्यांची नोंदणी यापूवीच रद्द केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List