दुष्काळी परिस्थिती – राज्य सरकारकडून आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी

दुष्काळी परिस्थिती – राज्य सरकारकडून आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी

राज्यातल्या धरणांतील पाण्याची पातळी खालावल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱयाचीही टंचाई निर्माण झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्यापही लागू आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे. पेंद्रीय निवडणूक आयोग यावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपन्न झाले. आता देशात इतर मतदारसंघांत मतदान होणार असले तरी महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया संपली आहे, मात्र राज्यात अद्यापही आचारसंहिता लागू आहे. मात्र ऐन उन्हाळय़ाचे दिवस असताना राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांना चारादेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारला यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना आचारसंहितेचे बंधन येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होण्यास किमान आठवडाभराचा तरी अवधी लागू शकतो. इतक्या कालावधीसाठी जर आचारसंहिता लागू राहिली तर उपाययोजना करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निवडणूक आयोगाला आचारसंहिता शिथिल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या वतीनेदेखील राज्याच्या दुष्काळी स्थितीबाबत आवाज उठविण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील सरकारकडे तातडीने दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 2019 सालीदेखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हादेखील आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. यावेळीदेखील असाच सकारात्मक निर्णय होईल अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;