शाहरुख खानला उष्माघाताचा फटका… तुम्हीही काळजी घ्या; ऊन लागण्याच्या आधी काय केलं पाहिजे?

शाहरुख खानला उष्माघाताचा फटका… तुम्हीही काळजी घ्या; ऊन लागण्याच्या आधी काय केलं पाहिजे?

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याला काल ऊन लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. अहमदाबादच्या उन्हाचा फटका शाहरुख खान याला बसला. शाहरुख खान याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी शाहरुख खान याच्यासोबत त्याची पत्नी गाैरी खान ही उपस्थित आहे. शाहरुख खान याला त्रास होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. फक्त अहमदाबादच नाही तर संपूर्ण देशभरात ऊन चांगलेच तापलंय. यादरम्यान शरीराची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिले तर उष्माघातापासून सुरक्षित राहू शकता. हेच नाही तर आहारामध्ये जास्तीत जास्त फळे आणि हिरव्या भाज्या खाणेही आवश्यक आहे. यामुळे उष्माघाताचा धोका टाळता येतो. दुपारच्या वेळी शक्यतो घराच्या बाहेर जाणेही टाळा.

सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत घराच्या बाहेर जाणे टाळा. शिवाय घराच्याबाहेर पडताना रूमाल, चश्मा, छत्री, टोपी हे घेऊन घराच्याबाहेर पडा. दुपारच्या वेळी फॅन, एसी, कुलर लावा आणि सतत पाणी पिण्यावर भर द्या. उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वात महत्वाचे की, दुपारच्या वेळी ताक, लस्सी आणि दही देखील आहारात घ्या.

उष्माघात टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आहारही योग्य ठेवा. दुपारच्या वेळात जास्त शारीरिक हालचाली देखील टाळा. शक्यतो चारनंतर काम करा. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो दुपारच्या वेळी आराम करा. लहान मुलांना उष्माघाताचा अधिक फटका बसण्याची शक्यता असते. यामुळेच दुपारच्या वेळी लहान मुलींना घेऊन अजिबात घराच्याबाहेर पडून नका.

शाहरुख खान याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. चुही चावला आणि गाैरी खान या शाहरुख खान याच्यासोबत रूग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. असे सांगितले जाते की, आता शाहरुख खान याचा तब्येत स्थिर आहे. शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसतात. शाहरुख खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;