प्रेग्नंसीवरून दीपिका ट्रोल, म्हणाले ‘फेक बेबी बंप’; आलिया भट्टने दिली प्रतिक्रिया

प्रेग्नंसीवरून दीपिका ट्रोल, म्हणाले ‘फेक बेबी बंप’; आलिया भट्टने दिली प्रतिक्रिया

अभिनेत्री दीपिका पादुकोणला सध्या सोशल मीडियावर बऱ्याच नकारात्मक टिप्पण्यांचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री आलिया भट्टने या नकारात्मक टिप्पण्यांविरोधात दीपिकाची साथ दिली आहे.

काही दिवसांपूर्वी दिपिकाचं पोट दिसत नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नंसीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता पोट दिसल्यावरही ‘फेक बेबी बंप’चा आरोप करत नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगदरम्यान ज्येष्ठ पत्रकार फाये डिसूझा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Faye D’Souza (@fayedsouza)

‘प्रिय सोशल मीडिया, दीपिका पादुकोण तिचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडली होत. तिने तिच्या शरीरावर किंवा प्रेग्नंसीवर तुमचा फीडबॅक मागितला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूवर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. फाये डिसूझा यांच्या पोस्टला आलिया भट्टने लगेचच लाइक केलंय. फक्त आलियाच नव्हे तर तिची बहीण पूजा भट्ट, शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांनीसुद्धा या पोस्टला लाइक केले आहेत.

काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती.

दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय ती लवकरच ‘कल्की 2989 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती प्रभाससोबत भूमिका साकारणार आहे. चित्रपटात दीपिका आणि प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;