एलआयसी अधिकारी सुनील गवळी यांच्या मृत्यूला निवडणूक प्रशासन जबाबदार

एलआयसी अधिकारी सुनील गवळी यांच्या मृत्यूला निवडणूक प्रशासन जबाबदार

मतदान केंद्रातील गैरसोयींमुळे एलआयसीचे अधिकारी सुनील गवळी यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. यासंदर्भात भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे आज तक्रार करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक अधिकारी कार्यालय प्रशासन या घटनेची गंभीर दखल व प्रामाणिकपणे जबाबदारी घेणार आहे का? असा सवालही तक्रारीत करण्यात आला आहे.

एलआयसीतील हजारो कर्मचारी निवडणूक डय़ुटीवर लावण्यात आले होते. सुनील गवळी यांची नियुक्ती भोईवाडा येथील बूथ क्रमांक 189 मध्ये होती. तिथे मूलभूत सुविधांचीही वानवा होती. आधीच कामाचा ताण आणि त्यातच गैरसोयीमुळे अस्वस्थ झाल्याने गवळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमा कर्मचारी सेनेने गवळी यांच्या मृत्यूमागील कारणेही तक्रारीत नमूद केली आहेत. मतदान प्रक्रिया राबवणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांना निवडणूक आयोगाकडून प्राथमिक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. 19 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजता मुख्य केंद्रात जमून निवडणूक साहित्य जमा करणे व तेथून निवडणूक बूथवर पोहचवणे अशी कामे त्यांना करावी लागली. त्यानंतर 20 मे रोजी मतदान संपेपर्यंतचे त्यांचे अनुभवही महाभयंकर होते.

या सर्व प्रक्रियेत सुनील गवळी या प्रामाणिक अधिकाऱयाचा बळी गेला. गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांची यात काय चूक होती? असा सवालही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केलेल्या तक्रारीत विचारण्यात आला आहे. अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी विनंतीही त्यात करण्यात आली. शिष्टमंडळात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते अनिल देसाई, विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, आमदार सुनील शिंदे, शिवसेना उपसचिव प्रवीण महाले, संघटनेचे कार्याध्यक्ष-शिव कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, शरद एक्के, सरचिटणीस महेश लाड, सचिव अनंत वाळके यांचा समावेश होता.

आयोगाच्या सूचनावजा धमक्यांमुळे टेन्शन

निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत सातत्याने निवडणूक आयोगाकडून सूचनावजा धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रचंड भीती व दबाव निर्माण झाला होता. आधीच व्याधीग्रस्त असलेल्या अधिकारी कर्मचाऱयांवर तर प्रचंड मानसिक त्राण आला होता, असेही भारतीय विमा कर्मचारी सेनेने म्हटले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;