मोदी सरकारने पुन्हा हात पसरले; रिझर्व्ह बँकेकडून 2.11 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत

मोदी सरकारने पुन्हा हात पसरले; रिझर्व्ह बँकेकडून 2.11 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत

देशाची अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षांत तब्बल पाच लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर्सच्या घरात नेण्याचे, तर 2030 पर्यंत तब्बल सात लाख कोटी डॉलर्सचे उद्दिष्ट गाठून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या बढाया मारणाऱया मोदी सरकारला भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर हात पसरावे लागले आहेत. आर्थिक वर्ष 2024 साठी आरबीआयने मोदी सरकारला तब्बल 2,10,874 कोटी रुपयांचा टेपू म्हणजेच विक्रमी सरप्लस म्हणजेच अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये आरबीआयने 87,416 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी सरकारकडे हस्तांतरित केला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 1.23 लाख कोटींचा अधिक निधी मोदी सरकारला पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.

आरबीआयने मोदी सरकारला दिलेला हा निधी आर्थिक वर्ष 2024 साठी आहे; परंतु आर्थिक वर्ष 2025च्या सरकारी खात्यांमध्ये हा निधी दिसून येईल. आरबीआयच्या पेंद्रीय संचालक मंडळाच्या 608 व्या बैठकीत या अधिशेषाची घोषणा करण्यात आली. आज मुंबईत गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोदी सरकारला अतिरिक्त निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोदी सरकारला दिलेला आतापर्यंतचा सर्वाधिक निधी

यंदा मोदी सरकारला आरबीआयकडून देण्यात आलेला सर्वाधिक वार्षिक अतिरिक्त निधी आहे. तज्ञांच्या मते रिझर्व्ह बँकेची फॉरेक्स होल्डिंगमधून मिळणारी कमाई लक्षात घेऊनच अतिरिक्त रकमेत इतकी मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्ष                 निधी  कोटींत

2023-24         2,10,874

2022-23        87,416

2021-22         30,307

2020-21         99,122

2019-20         57,128

2018-19         1,75,988

2017-18       50,000

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;