बाहरवाली सोबत राहणे गुन्हा नाही!
विवाहित पुरुष लग्न न करता दुसऱया एखाद्या महिलेसोबत राहत असेल तर त्याच्यावर दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने आपल्या पतीवर दुसऱया महिलेसोबत राहत असल्याचा आरोप केला होता. तिच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कुलदीप माथूर यांनी विवाहित पुरुष परस्त्राrसोबत लग्न न करता राहत असेल तर त्याच्यावर भादंवि कलम 494 अंतर्गत (पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे) गुन्हा दाखल करता येत नाही, असे स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीने पती किंवा पत्नीच्या हयातीत दुसरे लग्न केले तरच तो भादंवि कलम 494 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे. पण पती – पत्नी म्हणून एकत्र राहणाऱया महिलेने कायद्यानुसार वैध विवाह केला नसेल तर हे प्रकरण गुन्हा मानले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List