मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडय़ांत 1.7 कोटींचा फरक; काँग्रेसने आकडेवारी  मांडत केला सवाल

मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडय़ांत 1.7 कोटींचा फरक; काँग्रेसने आकडेवारी  मांडत केला सवाल

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांत जे मतदान झाले त्याचा रीयल टाइम डेटा आणि त्यानंतर जी अंतिम आकडेवारी  याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एक म्हणजे अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासाठी 11 ते 12 दिवसांचा उशीर का झाला आणि दुसरे म्हणजे मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडेवारी यात जवळपास 380 जागांवर तब्बल 1 कोटी 7 लाखांचा फरक आहे. त्याचे कारण काय, असा सवाल करत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पहिल्यांदाच असे घडल्यामुळे लोकांच्या मनात  निवडणूक प्रक्रियेबद्दलच संशय निर्माण झाला आहे. हा संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. संपूर्ण देशात प्रत्येक मतदाराला याबाबत चिंता वाटते. त्यामुळे आम्ही वारंवार मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले.  मिसिंग ईव्हीएम पुठे आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;