संविधान धोक्यात आहे असे सारखे म्हणू नका! निवडणूक आयोगाची खरगे यांना नोटीस
मोदी आणि भाजपला देशाचे संविधान बदलायचे असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीदरम्यान सातत्याने धारेवर धरले. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मोदी आणि भाजपची चांगलीच तारांबळ उडाली असताना आता भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने तत्परता दाखवत संविधान धोक्यात आल्याचे सारखे म्हणू नका, असे बजावणारी नोटीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बजावली आहे.
मोदी सरकार सत्तेत परतले तर संविधानच नष्ट करून टाकतील असा प्रचार काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List