23 जिल्हय़ांमध्ये पाण्याची भीषण टंचाई

23 जिल्हय़ांमध्ये पाण्याची भीषण टंचाई

राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.03 टक्क्यांवर आला आहे तर दुसरीकडे पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट निर्माण झाले आहे. निवडणुका संपल्याने आता तरी राज्य सरकारने दुष्काळाकडे लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठय़ाची माहिती आज जाहीर केली. त्यानुसार राज्यातील सर्व मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प अशा एकूण 2 हजार 994 धरणांमध्ये फक्त 24.03 टक्क्यांवर पाणीसाठा आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 34.36 टक्के पाणीसाठा होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण परिस्थिती

या आकडेवारीनुसार सर्वात कमी पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एकूण 920 धरणांमध्ये केवळ 9.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ 706.19 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. पुण्यातील एकूण 720 धरणांमध्ये 18.18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात पाणी आणि चाऱयाची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात फक्त 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची आकडेवारी सरकारनेच दिली आहे.

राज्यातील या भीषण परिस्थितीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी आम्ही चार महिन्यांपूर्वीच केली होती, पण राज्यातील भाजप, शिंदे, अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोडय़ा व दुसरे पक्ष पह्डण्यातच व्यस्त असल्याने त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. निवडणूक कार्यक्रम संपल्यामुळे आता सरकारने तातडीने चारा व पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

नाशिक-कोकण पाणीसाठा

नाशिकमधील 537 धरणांमध्ये 26.34 टक्के पाणीसाठा तर कोकणातील 173 धरणांमध्ये 37.41 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;