Pune Porsche Case: आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना 24 में पर्यंत न्यायालयीन कोठडी
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी सुनावणीच्या वेळी न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने खडे बोल सुनाववले आहेत. वडिल म्हणून तुम्ही योग्यप्रकारे तुमची भूमिका पार पाडली नसल्याचे ताशेरे ओढले.
बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जाब विचारला.
या प्रकरणी विशाल अगरवाल, प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे जयेश बोनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनाच न्यायालयाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
“या प्रकरणात वडिलांनी त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. मुलाकडे परवाना नसतानाही त्याला गाडी चालवायला देणं हे पालक म्हणून अपयश आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. पालकांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. कायद्याचे एक-दोन मुद्दे आहेत. या प्रकरणात दोन एफआयआर असणेही बेकायदा आहे. आतापर्यंत चर्चा सुरू आहे. दारुबंदी कायद्याचं कलम लावलं नव्हतं”, असं वकील असीम सरोदे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List