फडणवीसांची पत्रकार परिषद ही पुणेकरांची दिशाभूल करणारी, रविंद्र धंगेकर यांचा निशाणा

फडणवीसांची पत्रकार परिषद ही पुणेकरांची दिशाभूल करणारी, रविंद्र धंगेकर यांचा निशाणा

पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या हिट अँड रनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावेळी देशभरातून यावर टीका होत आहे. अशातच या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच मंगळवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या मुद्द्यावर आता रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत फडणवीसांची पत्रकार परिषद ही पूणेकरांची दिशाभूल करणारी असल्याची टीका केली आहे.

आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,  ”काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. 1) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का…? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. 2) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी – मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा…” असे म्हंटले आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अगरवाल याने शनिवारी मद्यपान करून बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला मंगळवारी संभाजीनगर येथून अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;