एकेकाळी 100 रूपये भाडे देऊन राहत होता अक्षय कुमार, म्हणाला, पैशांची कमी, भांडणे..

एकेकाळी 100 रूपये भाडे देऊन राहत होता अक्षय कुमार, म्हणाला, पैशांची कमी, भांडणे..

अक्षय कुमार याला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हटले जाते. अक्षय कुमार याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा आपल्या आरोग्याकडे देखील प्रचंड लक्ष देतो. अक्षय कुमारच्या दिवसाची सुरूवात सकाळी चार वाजल्यापासून सुरू होते. हेच नाही तर संध्याकाळी सहानंतर अक्षय कुमार काहीच खात देखील नाही, तो डाएट फॉलो करतो.

अक्षय कुमार हा कायमच आपल्या चित्रपटांचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतो. सोशल मीडियावर अक्षय कुमार सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतो. आता नुकताच अक्षय कुमार याने मोठा खुलासा केलाय. अक्षय कुमार हा आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसलाय.

अक्षय कुमार म्हणाला की, अगोदरपासून एकच ध्येय होते की, कायमच हसत राहायचे. आमच्या घरी हसण्याशिवाय दुसरे काहीही होत नव्हते. जेंव्हा आमच्याकडे पैसे कमी होते, आम्ही 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहत होतो. 100 रूपये भाडे त्या फ्लॅटसाठी होते. पैशांची चणचण असायची. तरीही आम्ही त्यावेळी हसत राहत होतो. कोणते वाद नसायचे काहीही नाही.

त्यावेळी मी माझी बहीण, आई, वडील राहत होतो. आम्ही घरचे काम सर्वजण मिळून करत होतो. आम्हाला फक्त हसायचे होते, रडायचे कधीच नाही. मी लोकांना फक्त हेच म्हणून इच्छितो की, तुम्हाला जर एखादी गोष्ट योग्य वाटते तर नक्कीच ती कायम करा. लोकांना अक्षय कुमार याचे बोलणे प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.

हेच नाही तर अक्षय कुमार याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अक्षय कुमार आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर अक्षय कुमार अत्यंत आलिशान अशा घरात राहतो. अभिनय आणि जाहिरातीमधून मोठा पैसा अक्षय कुमार याने कमावला आहे. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;