अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली ‘वेलकम 3’मधून माघार? खरं कारण आलं समोर

अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली ‘वेलकम 3’मधून माघार? खरं कारण आलं समोर

‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘वेलकम 3’ची घोषणा झाली. ‘वेलकम टू द जंगल’ असं या तिसऱ्या भागाचं नाव असून त्याच्या टीझरमध्ये मुन्ना आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसले. त्यांच्यासोबतच अभिनेता अक्षय कुमारसुद्धा होता. संजय दत्त, अर्शद वारसी आणि अक्षय कुमार ही स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढली. मात्र या चित्रपटातून संजय दत्तने माघार घेतल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. अक्षयसोबतच्या वादामुळे संजू बाबाने प्रोजेक्ट सोडल्याची चर्चा होती. पण या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजयने अक्षयमुळे नाही तर आजारपणामुळे चित्रपट सोडल्याचं कळतंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्तने काही महिन्यांपूर्वीच हा प्रोजेक्ट सोडला होता. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर चित्रपटातील ॲक्शन सीन्स करता येत नसल्याने त्याने माघार घेतल्याचं कळतंय. “संजय दत्त या चित्रपटासाठी खूप उत्सुक होता आणि त्याने शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण दुर्दैवाने मढ आयलँडमध्ये एका दिवसाच्या शूटिंगनंतर त्याने दिग्दर्शकांना कळवलं की तो आरोग्याच्या कारणास्तव पुढील शूटिंग करू शकणार नाही. हे काही महिन्यांपूर्वी घडलं होतं. कॅन्सरशी झुंज आणि त्यापुढील उपचारामुळे त्याला शूटिंग पूर्ण करणं जमलं नव्हतं. वेलकम 3 हा चित्रपट जरी कॉमेडी असला तरी त्यात बरेच ॲक्शन सीन्स आहेत. संजयच्या भूमिकेच्या वाटेला ते सीन्स अधिक आले आहेत. ते जमणार नसल्यानेच त्याने नकार दिला”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संजय दत्तला स्टेज 4 फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. काही महिन्यांच्या उपचारानंतर तो कॅन्सरमुक्त झाला. ‘वेलकम 3’मधून संजयने माघार घेतल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टीने त्याची जागी घेतली. या चित्रपटाची शूटिंग अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी यांच्यासोबतच रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक यांच्याही भूमिका आहेत. अहमद खान या चित्रपटाचं शूटिंग करत असून येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;