अखेर उजनी धरणात बुडालेली बोट सापडली, 6 जण अद्याप बेपत्ताच

अखेर उजनी धरणात बुडालेली बोट सापडली, 6 जण अद्याप बेपत्ताच

उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात मंगळवारी बुडालेली प्रवासी बोट अखेर आज सापडली आहे. जवळपास 35 फूट खोल पाण्यात ही बोट सापडली आहे. जवळपास 17 तास ही शोधमोहिम सुरु होती. बोटीमधील सात प्रवाशांपैकी सहा प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने ते दगावल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले सहा जण बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांना पोहता येत असल्याने ते बचावले आणि त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली होती. बेपत्ता लोकांमध्ये दोन लहान मुलांसह तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. त्यांचे साहित्य मिळालेले असले तरी त्या सहाही जणांचा शोध लागलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;