पुणे अपघातप्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध?

पुणे अपघातप्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध?

पुण्यातील कार अपघात प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल याची आज बुधवारी बाल हक्क न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान आता या प्रकरणात नवे वळण आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे नाम समोर आले आहे, या प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांत अगरवाल (17)च्या कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपी वेदांतचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा त्यांचा भाऊ राजकुमार अगरवाल याच्याशी संपत्ती वाद सुरु होता. तो वाद मिटविण्यासाठी सुरेंद्र यांनी 2007 आणि 2008 साली बॅंकॉकमध्ये जाऊन छोटा राजन याची भेट घेतली होती. 18 मे रोजी पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर अल्पवयीन आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, त्यानंतर अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या. अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी असलेले संबंध उघडकीस आल्यावर या कुटुंबाचा प्रभाव केवळ पुणे पोलिसांपर्यंतच नाही तर अंडरवर्ल्डपर्यंतही होता हे स्पष्ट झाले.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अगरवाल याने शनिवारी मद्यपान करून बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होताच अगरवाल फरार झाले होते.मात्र पोलिसांनी तपास वेगाने करत संभाजीनगर येथून विशाल अगरवाल यांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पब मालक आणि मॅनेजरलाही अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;