कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली; FLiRT व्हेरियंटचे देशात 300 तर राज्यात 100 रुग्ण

कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली; FLiRT व्हेरियंटचे देशात 300 तर राज्यात 100 रुग्ण

कोरोनाने जगाला दोन-अडीच वर्षे विळखा घातला होता. या काळात जगाने कोरोनाचा प्रकोप पाहिला. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. तसेच कोरोनाने बसलेल्या आर्थिक फटक्यातून अनेक देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आता कोरोना ओसरला असल्याचे समजत जगाने मोकळा श्वास घेतला होता. तोच आता पुन्हा एकदा कोरोनाने जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसच्या FLiRT व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटचे देशात 300 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 100 रुग्ण आढळले आहेत.

सिंगापूरसह जगात काही देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट FLiRT आढळला आहे. या व्हेरिएंटने आता देशातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या FLiRT प्रकाराचे रुग्ण आढळले होते. आता हिंदुस्थानातही कोरोनाच्या फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात या व्हेरिएंटचे 300 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 100 रुग्ण आढळले आहेत.

देशात कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटच्या 300 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या फ्लर्ट व्हेरियंटचे सुमारे 100 रुग्ण आढळले आहेत. देशात फ्लर्ट व्हेरियंटच्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रासह गोवा, कोलकाता, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.

FLiRT हा कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन उपप्रकार KP.1 आणि KP.2 आढळून आले आहेत. त्याला FLiRT व्हेरियंट असे नाव देण्यात आले आहे. सिंगापूरमध्ये कोविडच्या या नवीन लाटेच्या उद्रेकानंतर आता हा व्हेरियंट जगभरात पसरत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेने जगाची चिंता वाढवली आहे. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोविडच्या नव्या लाटेचा उच्चांक दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंगापूरमध्ये दिवसभारत या व्हेरियंटचे सुमारे 25,000 सक्रिय रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;