केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि बसला अपघात; 20 प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि बसला अपघात; 20 प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

>>चेतन वाघमारे, वर्धा

वर्धा नागपूर रोडवर असलेल्या केळझर गावाजवळ बस आणि ट्रॅव्हलमध्ये अपघात झाला असून या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

केळझर येथील शहीद हरिभाऊ लाखे चौकातील ही घटना आहे. सकाळी ट्रॅव्हल्सने बसला जबर धडक दिली असून दोन्ही गाड्यांना पुढील भागात मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने प्रवाशी गंभीर जख्मी आहेत. वर्धा जिल्ह्यात असलेल्या जरा मंदिरात बुधवार हा दिवस मोठा असतो व याच मंदिरात दर्शनासाठी म्हणून सेलू येथील बृहस्पती मंदिरातून ही ट्रॅव्हल जात होती. ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशी हे टाकळघाट येथील असल्याची माहिती आहे. तर वर्धा येथून नागपूरला प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसवर ही ट्रॅव्हल्स धडकली. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील 16 प्रवासी जखमी तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश आहे.

स्थानिकांच्या मदतीने जखमींना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;