सुट्टीसाठी वाट्टेल ते…तिने जुळ्या बहिणीला पाठवले ऑफिसला

सुट्टीसाठी वाट्टेल ते…तिने जुळ्या बहिणीला पाठवले ऑफिसला

जुळ्या बहिणींची करामत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कॅनडाच्या एरी चेंस आणि नोए चेंस या जुळ्या बहिणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. एरी चेंस ज्या कंपनीत काम करते, तिथे तिची सुट्टी रद्द करण्यात आली. त्यामुळे एरीने आपल्या जागी जुळी बहीण नोए हिला कामावर पाठवले आणि स्वतः फिरायला गेली. मात्र ऑफिसमध्ये लवकरच याचा भंडाफोड झाला.

एरीची जुळी बहीण नोए हिने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमुळे गडबड झाली. व्हिडीओत जुळ्या बहिणींबद्दल सांगताना नोए म्हणाली, आमच्या एकसमान दिसण्यामुळे बरेचदा लोक गोंधळून जातात. त्यामुळे जेव्हा एकमेकींना गरज असते तेव्हा आम्ही एकमेकींच्या जागी जातो आणि लोकांना ते समजत नाही.

एरीच्या बॉसने हा टिकटॉकवरचा व्हिडीओ बघितला आणि त्याला झालेला प्रकार समजला.  बॉसने कंपनीची फसवणूक केल्याचा खरमरीत ई-मेल एरीला पाठवला. बॉसने एरीला माफी मागण्यास सांगितले. कंपनीने तिच्यावर कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा विचारणा केली. बॉस चिडल्यानंतर एरी आणि नोएला काही सुचेनासे झाले आहे. हे प्रकरण कसे सोडवावे याचा सल्ला त्यांनी सोशल मीडिया  फॉलोअर्सना विचारला आहे. दोघींचे 8 लाख सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत. ते  वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स लिहीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;