कुंपणच आता शेत खातय…लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय; निलेश लंके यांचा आरोप

कुंपणच आता शेत खातय…लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय; निलेश लंके यांचा आरोप

नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. तो लगेच हाणून पाडण्यात आला. कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असा आरोप निलेश लंके यांनी म्हटले आहे.

नगर दक्षिण मतदार संघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेने रंगेहात पकडला. सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला. केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असतानाही एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी ? अगदी त्या भागातील वाहतूकही वळविण्यात आलेली असताना पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत की प्रशासनच झोप घेतल्याचे सोंग करत आहे? सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाठ हे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका घेत आहेत. त्यामुळे या व्यक्तीच्या प्रवेशाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

निलेश लंके यांनी एक्सवर एका व्हिडीओसह पोस्ट करत हा आरोप केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;