दिल्ली मेट्रोत केजरीवाल यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज लिहिणाऱ्या आरोपीला अटक
मेट्रो स्टेशनवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. या धमकीचे फोटोही ‘आप’कडून शेअर करण्यात आले होते.
अंकित गोयल (33) असे त्या आरोपीचे नाव आहे. मेट्रो स्टेशनवर मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज दिला होता. दिल्ली पोलिसांच्या मेट्रो यूनिटने याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता आणि याप्रकरणाचा तपास करत होते. असे त्याने का केले याबाबत आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. 19 मे रोजी पटेल नगर आणि राजीव चौक मेट्रो स्टेशनवर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासाठी धमकीचा मेसेज लिहिला गेला होता. पोलिसांनी संदेश लिहिणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. आरोपीने असे कृत्य प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित गोयल हा बरेली येथील रहिवासी आहे आणि तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या मेट्रो युनिटने एफआयआर नोंदवला होते आणि प्रकरणाचा तपास करत होते. मेट्रो ट्रेनच्या आत आरोपीने लिहिले होते, “केजरीवाल कृपया दिल्ली सोडा. अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List