दिल्ली एनसीआरमधील 150 हून अधिक शाळांना धमकीचे ईमेल बुडापेस्टमधून पाठवल्याचा अंदाज
1 मे रोजी दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 150 हून अधिक शाळांना बॉम्बची अफवा असलेला ईमेल पाठवण्यात आला होता. या ईमेलमुळे सगळीकडे खळबळ माजली होती. मात्र आता हे ई-मेल्स कुठून पाठवण्यात आले होते याचा उलगडा तपासांती झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या ईमेल्सचा आयपी अॅड्रेस हंगेरीमधील बुडापेस्टचा असल्याचे समजले आहे. सध्या दिल्ली पोलीस हंगेरियन तपास यंत्रणेच्या संपर्कात आहेत. दहशतवाद्यांनी वापरलेला मेल सर्व्हर mail.ru रशियाचा असल्याची माहिती मिळाली आहे. इंटरपोलच्या माध्यमातून पोलिसांना रशियाकडून माहिती मिळविण्यास मदत झाली आहे. यामुळेच धमकी देणाऱ्या मेलचा आयपी अॅड्रेस बुडापेस्टचा असल्याचे आढळून आले आहे. तसेच ईमेल पाठविण्यासाठी डार्क वेबचा वापर करण्यात आला असावा, कारण पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्या शोध घेण्याकरीता बराच प्रयास करावा लागला. ईमेल पाठविणाऱ्याने [email protected] टेम्पेल नावाची विनामूल्य ईमेल सेवा वापरली जी तासाभरात कालबाह्य होते. त्यामुळे ईमेलचा पत्ता जाणून घेणे अवघड झाले होते. ईमेलच्या भाषेवरून प्रेषकांनी दशहतवादी संघटना इस्लामिक स्टेट (IS)च्या प्रचार सांधनाचा वापरलेल्या शैलीची कॉपी केली होती.
या महिन्याच्या सुरुवातीला ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व शाळांमध्ये जाऊन शोधमोहीम राबवली. पोलीस कुत्रे आणि बॉम्बशोधक पथकासह शाळांमध्ये पोहोचले. धमकीचा ईमेल खोटा असल्याचे नंतर उघड झाले, त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना घाबरू नका असे आवाहन केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List