ट्रोलला कंटाळून महिलेची आत्महत्या; पाच वर्षे आणि आठ महिन्यांची पोरं झाली पोरकी
आईच्या कुशीतून निसटलेले मूल दुसऱया मजल्यावरील एका शेडमध्ये अडकले. या बाळाला वाचवण्यात आले. याचा व्हिडीओ शेजाऱयाने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱया व्यक्तीचे कौतुक केले, परंतु महिलेला दोषी ठरवत सोशल मीडियावरील युजर्सनी या महिलेला चांगलेच ट्रोल केले. सतत होत असलेल्या ट्रोलिंगला कंटाळून महिला दोन आठवडय़ांपूर्वीच पती आणि मुलांसह माहेरी गेली, परंतु या ठिकाणीही ट्रोलिंगने पाठ सोडली नाही. महिलेला होणारा त्रास आणखी वाढला. महिलेने अखेर या सर्व ट्रोलिंगला कंटाळून आपले आयुष्य संपवले. या महिलेला दोन मुले असून एक पाच वर्षांचे, तर दुसरे अवघ्या आठ महिन्यांचे आहे. सोशल मीडियावर अपमानास्पद भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून ट्रोल केल्यास सायबर गुह्यात मोडतो. तसेच यासाठी शिक्षेची तरतूदही आहे, असे तज्ञांनी सांगितले.
माहेरी जाऊनही ट्रोलिंग थांबली नाही
ही घटना 28 एप्रिलची आहे. हे मूल महिलेच्या काखेत बसलेले होते, परंतु अचानक ते हातातून निसटले आणि दुसऱया मजल्यावरील बनवलेल्या एका शेडमध्ये अडकले होते. सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे महिलेला दोन आठवडय़ांपर्यंत ट्रोलिंग केले जात होते. ट्रोलिंगला कंटाळून महिला माहेरी गेली, परंतु तेथेही तिला ट्रोलिंग करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List