अंतराळाची पिकनिक! गोपी थोटाकुरा ठरले पहिले हिंदुस्थानी पर्यटक

अंतराळाची पिकनिक!  गोपी थोटाकुरा ठरले पहिले हिंदुस्थानी पर्यटक

मूळचे हिंदुस्थानी वैज्ञानिक असलेले गोपी थोटाकुरा यांनी इतिहास रचला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजनच्या एनएस-25 मिशनच्या चालक दलात सहभागी होऊन अंतराळात पोहोचणारे पहिले इंडियन स्पेस टूरिस्ट आणि दुसरे हिंद्स्थानी बनले आहेत. ब्लू ओरिजनने रविवारी आपली 7 वी मानव अंतराळ उड्डाण आणि न्यू शेपर्ड कार्यक्रमासाठी 25 वी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केली. चालक दलाच्या अन्य पाच सदस्यांमध्ये आंध्र प्रदेशात जन्मलेले गोपी थोटाकुरा यांचाही समावेश होता. गोपी थोटाकुरा यांच्याशिवाय, अंतराळ प्रवासी दलात मेसन अँजेल, सिल्वेन चिरोन, केनेथ एल. हेस, कॅरोल स्कॉलर आणि माजी वायू सेनेचे कप्तान एड. ड्वाइट यांचा समावेश होता. ड्वाइट यांनी 1961 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन ए. कॅनेडी यांनी त्यांची निवड केली होती. परंतु, त्यांना प्रत्यक्षात संधी मिळाली नव्हती.

गोपी थोटाकुरा हे पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले प्रवासी तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे हिंदुस्थानी नागरिक ठरले आहेत. हिंदुस्थानी लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळात जाणारे पहिले हिंदुस्थानी बनले होते. पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा मी पहिला हिंदुस्थानी व्यक्ती ठरत आहे, हे ऐकून मला खूप अभिमान वाटत आहे. हिंदुस्थान पुन्हा एकदा अंतराळात आहे, असा आवाज ऐकायला मिळतोय.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;