युक्रेनचा पलटवार! सात दिवसांत रशियाचे 1500 सैनिक ठार

युक्रेनचा पलटवार! सात दिवसांत रशियाचे 1500 सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. या दोन्ही देशांतील युद्धाला आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या या लढाईत कधी युक्रेन तर कधी रशियाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांतील लाखो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. खारकीव जिंकणे रशियाला चांगलेच महागात पडले असून अवघ्या सात दिवसांत रशियन सैन्याने आपले 1500 जवान गमावले आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात मिसाईल आणि टँकसुद्धा गमावण्याची पाळी रशियावर आली आहे. युद्धात युक्रेनचे सैन्य पिछाडीवर पडले असून अमेरिकेकडूनही अपेक्षित मदत मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी झेलेन्स्कींनी आता नाटोकडे मदत मागितली आहे.

रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या खारकीव शहरातील अनेक भागांत कब्जा केला आहे. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रs देण्याच्या मदतीची घोषणा केली, परंतु आतापर्यंत युक्रेनपर्यंत शस्त्रास्त्रs पोहोचलेली नाहीत. शस्त्रs कमी पडल्याने युक्रेनच्या सैन्याचे मनोबलही खचले आहे. दुसरीकडे रशियाचे सैन्य युक्रेनच्या शहरावर लागोपाठ बॉम्बस्फोट करत आहे.

 

झेलेन्स्कींची नाटोकडे धाव

युक्रेनचे राष्ट्रपती व्लोडिमीर झेलेन्स्कींनी कीवला वाचवण्यासाठी नाटोकडे धाव घेतली आहे. नाटो देशाने रशियाविरुद्ध युद्धात भरपाईसाठी जास्तीत जास्त मदत करावी, असे युक्रेनला वाटत आहे. अमेरिकी एफ-16 लढाऊ विमानांची खेप अद्याप मिळाली नाही. रशियाच्या मिसाईलला पाडा आणि आमच्या नागरिकांना वाचवा, अशी विनंती युक्रेनने अमेरिकेकडे केली आहे.

ड्रोन, सैन्य वाहने आणि टँकचेही नुकसान

युक्रेनने दावा केला आहे की, खारकीवमध्ये भीषण युद्धात रशियाने 1500 हून अधिक जवान गमावले आहेत. गेल्या सात दिवसांत 1572 सैनिक, 75 ड्रोन, 66 सैन्य वाहने आणि 8 टँकसह 263 सैन्य उपकरणे रशियाने गमावली, असे युक्रेनने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;