घाटकोपर दुर्घटना आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 17 वर पोहोचला

घाटकोपर दुर्घटना आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 17 वर पोहोचला

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले राजू सोनवणे (52) यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये 13 मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला होता. यावेळी घाटकोपरच्या छेडानगर येथे महाकाय होर्डिंग रस्त्यावर आणि बाजुच्या पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेमध्ये सुरुवातीला 16 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर अनेक जखमींवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यातील आणखी एकाचा 19 मे रोजी केईएम रुग्णालयात रात्री 11 वाजता मृत्यू झाला. दरम्यान, 120 बाय 120 फुटांपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग कोसळल्याने अनेक वाहनांचा चुराडा झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;