मस्तवाल वेदांतचा आणखी एक कारनामा…त्याच्यामुळे माझ्या मुलाची शाळा बदलली…प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा आरोप

मस्तवाल वेदांतचा आणखी एक कारनामा…त्याच्यामुळे माझ्या मुलाची शाळा बदलली…प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा आरोप

पुण्यात नुकत्याच झालेल्या पोर्शे कारच्या अपघातातील अल्पवयीन आरोपीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. सुमारे 600 कोटींचा मालक असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या वेदांत या मस्तवाल मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी मोठा आरोप केला आहे. त्याच्यामुळे मला माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली होती, असा आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे.

सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून बिल्डरच्या प्रतापी मुलावर आरोप केले आहेत. सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सिडंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असेही सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे.

प्राजक्त तनपुरे यांचे राजकीय क्षेत्रात वजन आहे. एवढे राजकीय वजन असूनही हा बिल्डर आणि त्याचा मुलगा किती मुजोर होता हे यावरून दिसून आहे. बिल्डरच्या या मुलामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. त्या मुलांच्या त्रासामुळे मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकविल्याचे सोनाली याांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;